समाजसुधारक लोकहितवादी-गोपाळ हरी देशमुख -Samajsudhark Lokhitwadi Gopal Hari Deshmukh



                  लोकहितवादी-गोपाळ हरी देशमुख

परिचय : 

                     नमस्कार मित्रानो आज आपण गोपाळ हरी देशमुख (लोकहितवादी) यांच्याबद्दल असणारी व स्पर्धा परीक्षेला अत्यंत उपयुक्त अशी माहिती बघणार आहोत त्यासाठी आपण त्यांच्याबद्दल छोटासा परिचयजाणून घेऊ,

                      लोकहितवादी यांचा महाराष्ट्रातील आद्य समाजसुधारकांच्या पिढीतील एक अग्रेसर विचारवंत म्हणून उल्लेख केला जातो . गोपाळ हरी देशमुख ही लोकहितवादिचे पूर्ण नाव होते. त्यांचे मूळ नाव सिद्धे असे होते. पण देशमुख ही नाव त्यांना वतनावरून पडले होते.

स्पष्टीकरण : लोकहितवादीयांचा जन्म 18 फेब्रुवारी 1823 रोजी पुणे येथे झाला.त्यांचे वडील हरीपन्त हे  पेशव्यांचे सेनापति बापू गोखले यांचे फडणीस होते. लोकहितवादी 13 वर्षाचे असतानाच त्यांचे वडील मृत्यू पावले. त्यामुळे कुटुंबाचा सर्व भार त्यांच्या स्वतःवर आणि त्यांचे थोरले बंधु चिंतमानराव यांच्यावर पडला परंतु हे सर्व असतानाही लोकहितवादी यांनी आपले शिक्षण चालूच ठेऊन आपले शिक्षण पूर्ण केले.लोकहितवादी कुशार्ग बुद्धीचे,करारी व कर्तबगार होते. हे जसे निरलस कार्यकर्ते होते.1848 मध्ये त्यांनी भाऊ महाजन यांच्या ‘प्रभाकर’या साप्ताहिकात ‘लोकहितवादी’या नावाने लेख लिहिण्यास प्रारंभ केला.1848 ते 1850 या दोन वर्षात त्यांनी हिंदू समाजाला उद्देशून जी ‘शतपत्रे’ लिहिली त्यावरून पुरोगामी दृष्टिकोण,समजहिताविषयीची कळकळ,विद्वत्ता इत्यादि गोष्टींची कल्पना येऊ शकते.

                      पुढे लोकहितवादी यांनी 1882 मधे लोकहितवादी या नावाचे मासिक व 1883 मध्ये त्याच नावाचे त्रैमासिक सुरू केले. भारतीय समाजातील जातीयव्यवस्था या समाजाच्या अधोगतीस कारणीभूत झाली आहे, असे त्यांचे मत होते. म्हणून त्यांनीजातीयव्यवस्था व वर्णभेद यांस विरोध केला होता.

सामाजिक विचार :

                      लोकहितवादी यांनी संजाहितला प्राधान्य देऊन सर्वांगीण संजीक सुधारणा घडवून आणण्याबद्दल आग्रह धरला. ते समजसुधारण्याला ध्यास घेतलेले मोठे विचारवंत होते आपल्या समाजातील अनिसठ रूढी परंपरा दूर करून सर्वांगीण सामाजिक प्रगतीचा विचार करावा,समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन स्वतःची उन्नती साधावी,अंधश्रद्धा,भोळ्या समजुती व संकुचित विचार यांचा त्याग करावा,असे त्यांनी म्हटले होते. अर्थात,त्यासाठीआपल्या समाजातील नानविध दोष व विकृती यावर त्यांना निर्दयतेने कोरडे ओढावे लागले होते.

                     भारतातील इंग्रजी राजवटीविषयी लोकहितवादिनी अनुकूल मत व्यक्त केले होते. या देशात ईश्वराच्या प्रेणेने इंग्रज यांचे राज्य स्थापन झाले आहे भारतीय राजांची अधोगती थांबविण्यासाठी आणि त्यात सुधारणा घडवून आनन्यासाठी ईश्वरणेच इंग्रजी सत्तेची योजना केली आहे,लोकहितवादी यांनी इंग्रजी राजवटीपासून मिळणाऱ्या फायद्याचे वर्णन आपल्या लिखाणातून केले असले तरी येथील बहुजन समाजाच्या हिताचा विचार करून राज्यकरत्याचे अनेक दोषांवर कडक टीकाही त्यांनी केली होती.दिवाळखोर सारदारांचा धूर्त कारभारी जसा संसार पाहतो तसे इंग्रज सरकार या देशाचे राज्य चालवीत आहे’  असे त्यांचे म्हणणे होते.शततपत्रामधील एक लेखात लोकहितवादिनी इंग्लंड मधील राज्यकारभार कसं चालतो व तेथील पार्लीमेंट च्या हाती किती सत्ता आहे याचे वर्णन करून पुढे असे म्हटले होते की ‘आपण सर्व एकत्रित होऊन विलायतेत शिष्टमंडळ पाठवावे आणि आपल्या देशाला पार्लीमेंट माघून घ्यावे’. भारतीय जनतेत पराकोटीचे दारिद्र्य असून तिची आर्थिक दुरवस्था दूर करण्यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा व आपल्या प्रजेचे संरक्षण करावे, अशी मागणीही त्यांनी केली होती.

                   
समाजसुधारक लोकहितवादी-गोपाळ हरी देशमुख -Samajsudhark Lokhitwadi Gopal Hari Deshmukh



मूल्यमापन :

                   लोकहितवादी यांच्या विचारा वरुण त्यांची बुद्धी व त्यांच्याकडे असलेले द्यान याचे आपल्याला प्रचिती होते. एओकणीसाव्या शतकातील भारतीय समाजातील दोष,रूढी,परंपरा यावर त्यांनी अचूक बोट ठेवले होते. त्यांनी जेवढे आखी लिखाण लिहिले त्यातू समाजहितासाठी असलेली तळमळ लकक्षात येते. याच तळमळील त्यांच्या विचाराची जोड मिळाली होती. म्हणूनच त्यांचे विचार येथील समाजाला अत्यंत मार्गदर्शक ठरले होते. ग. बा. सरदार यांनी त्यांच्यासंबंधी असे म्हटले आहे की,लोकहितवादीनची पायाशुद्ध प्रणाली पहिली म्हणजे त्यांना ‘महाराष्ट्रातील राष्ट्रवादाचे आद्यप्रवर्तक’म्हणून संबोधावायस हरकत वाटत नाही. लोकहितवादीच्या  विचारविषयी पुरोगामित्व व द्रष्टेपण याविषयी शंका घेण्यास मुळीच जागा नाही. उकत्ती व कृती यांच्यामधील असणारी तफावत ही त्यांची मुख्य मर्यादा होती. परंतु त्यांचे जे विचार होते त्याविचाराप्रमाणे कृती करणायात कमी पडले. अशी टीका त्यांच्यावर सर्वत्र केली जाते. हे  सगळे असताना देखील त्यांचयविचारचे महत्व  कमी झाले दिसत नाही. उलट पक्षी विचारपरोबोधनाच्या युगाचा आद्य प्रवर्त व सामाजिक पुनर्रचनेची महुर्तमेड रोवणायस महत्व पूर्ण ठरलेला आधारस्तंभ म्हणूनच त्यांच्याकडे आज पहिले जाते .

                  श्री. के . क्षीरसागर लोकहीतवादी विषयी म्हणतात –“ जो ह्या लोकहितकर्त्यंचे स्वरूप प्रत्यक्ष त्याच्या वाङमय सागरातपहिल उर्फ त्यास सरदार गोपाल हरी देशमुख हे खानदानी घराण्यातील संभावित गृहस्त ,इंग्रजी, संस्कृत, फारसी वगैरे वाङमयचा गाढा अभ्यास केलेले बहुश्रुत विद्वान ,अत्यंत नेकीने वागणरे अधिकारी, दुरदृष्टीने विचार करणारे सामाजिक व राजकीय विचाराग्रणी आणि महाव्यासंगी व सामर्थ्यवान गद्य लेखक असेच दिसतील . अश्या असामान्य व्यासंगी व अष्टपैलू लेखकाचे ग्रंथ ज्ञानकोशाप्रमाणे  भाषेत चिरकाल ज्ञावर्ध्याक ठरतील यात शंका नाही.

धार्मिक विचार :

                  लोकहितवादी यांनी भारतीय समाजात असणाऱ्या जुन्या धर्माविष्यक असणाऱ्या कल्पनाव प्रखर टीका देखील केली. जून धर्मग्रंथ वाचून आणि त्यांना प्रमाण मानून आताच्या काळात तसे वर्णन कारणे मूर्खपणा आहे असे त्यांचे म्हणणे होते. आजच्या काळात धार्मिक ग्रंथाचे अध्ययन करण्यापेक्षा अधूनिक डद्यान संपादन करणे ही आजच्या समाजाला हितकारक आहे असे लोकहितवादी यांनी समजाला सांगितले त्यांचे असे म्हनने होते की किती पन धार्मिक ग्रंथ वाचले किंवा पोंथी पुराणे वाचली तरी पन ईग्रज भारतात कसे आले ही समजणार नाही. तसे “जन्मभर जुन्या गोष्टी सांगितल्या व सांप्रतचे विचार केले नाहीत तर त्याचा की उपयोग?”

                  हिंदू धर्मातील धार्मिक चालीरीती व रूढी परंपरा यावर देखील लोकहितवादी यांनी टीका केली. आजच्या काळातधर्माला विकृत रूप प्राप्त झाले आहे. धर्माच्या नावावर अनेक निंद्य प्रकार घडत आहे. असे या धर्मातील दोष दाखवून त्यांनी पुढे असे प्रतिपादन केले आहे की,धर्मप्रकरणी सदसद्विवेकबुद्धीला प्राधान्य द्या. ईश्वरवर श्रद्धा असू द्या;पन परिस्थितीप्रमाणे शाश्रे बदला. द्यान हीच शक्ति याची जाणीव ठेवून आधुनिक द्यानाचे संपादन करण्याचा प्रयत्न करा. लोकहितवादीनचा मूर्तिपूजेला विरोध होता तसेच आपल्या लोकांवर निष्करतेवरही टीका केली. धर्माच्या नावावर निष्क्रिय बनून राहणे किंवा वैराग्य स्वीकारणे मूर्खपणाचे आहे. इंग्रजांच्या कृतीशीलतेमुळे व उद्योगीपानमुळे त्यांनी हिंदुस्तानवर आपले राज्य स्थापन केले टेवा त्यापासून बोध घेऊन आपणही कृतिशील बनले पाहिजे,असे त्यांनी सांगितले होते. धार्मिक बाबतीत प्रतेकाला आपल्या मनाप्रमाणे आचरण करण्याची आणि लिहिण्या बोलण्याची मुभा असावी, असे लोकहिवादीनचे मत होते.

 

ग्रंथसंपदा :

                 लक्ष्मीज्ञान, हिंदुस्तानास दरिद्र येण्याची कारणे आणि त्याचा परिहार व व्यापारविषयी विचार ,शतपत्रे ,ऐतिहासिक गोष्टी ,गीतातत्व ,पृथ्वीराज चव्हाण यांचा इतिहास, राजस्थानचा इतिहास ,निगमप्रकाश (गुजराती) ,निबंध संग्रह ,भिक्षुक ,कलियुग ,पाणीपतची लढाई इत्यादि.

सारांश :      

              गोपाळ हरी देशमुख यांनाच लोकहितवादी असे म्हणतात.यांचा जन्म 18 फेब्रुवारी 1823 ल पुणे येथे झाला. त्यांचे मूळ आडनाव सिद्धे असे होते. त्यांनी भारतीय समाजात असणारी जातीयव्यवस्थेवर प्रखर टीका केली. लोकहितवादी यांना इंग्रजांचे शिस्त,उद्योगप्रियता,चिकाटी,देशाभिमान,शौर्य,हे गुण त्यांना फार आवडे,त्याऐवजी भारतीय लोक आळशी,भित्रे,स्वार्थी,संकुचित आहेत असे त्यांना नेहमी वाटत असे.त्यांनी पुनर्विवाहस प्रोत्साहन भरपूर मोठ्या प्रमाणात दिले. भारतीय समाजात असणारी बहुपतनीत्व,बालविवाह,हुंडा,या अनिष्ट सामाजिक बाबींवर त्यांनी टीका केली.समाजातील असणारी जून धर्मग्रंथ प्रमाण मानने हे मूर्खपणा आहे असे ते नेहमी सांगत होते. याच बरोबर त्यांनी मूर्तिपूजेला विरोध केला. भारतीय समाजातील लोकांनी भौतिकशास्राचा अभ्यास केला पाहिजे असा त्यांचा नेहमी आग्रह होता. लोकहितवादी यांनी ब्रिटिश काळात शासनात मूनसफ,भाषांतरकार,असिस्टंट कामीशनर,असिस्टंट जज,जाइंट सेशन जज अशा अनेक पदावर कार्य केले.शतपत्रकर म्हणून ओळखले जाणारे समाजसुधारक म्हणजे लोकहितवादी होते. इंग्लंडसारखे संसद भारतात असावी अशी इंग्रजाकडे मागणी करणारे समाजसुधारक लोकहितवादी होते.1848-1850 दरम्यान भाऊ महाजन यांच्या प्रभाकर मध्ये त्यांनी 108 शतपत्रे लिहिली. सरकारी नोकरी करत समजसुधारणेसाठी कार्य केले.1880 मध्ये मुंबई विधिमंडळ सदस्य म्हणून त्यांची नेमणूक झाली. 1882 मध्ये “लोकहितवादी” नावाचे मासिक काढले. त्यांची ग्रंथ संपदा म्हणजे ग्रामरचणा,पानिपत,स्थानिक स्वराज्य व्यवस्था,लक्षमी द्यान,शतपत्रे,लंका,आगम प्रकाश ,स्वाध्याय,गुजरात,राजस्थान,गीतातत्व,इत्यादि त्यांची ग्रंथ संपदा होती. जस्टिस ऑफ पिस, रावबहादूर या प्रकारच्या पदव्या सरकारने गोपाळ हरी देशमुख यांना दिल्या .

             

                              

समाजसुधारक लोकहितवादी-गोपाळ हरी देशमुख -Samajsudhark Lokhitwadi Gopal Hari Deshmukh